आमच्या बद्दल
प्रस्तावना
जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम – आपले स्वागत आहे
वाशिम शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित, जिल्हा सामान्य रुग्णालय हे विदर्भातील एक महत्वाचे सार्वजनिक आरोग्यसेवा केंद्र आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत हे रुग्णालय वाशिम आणि आजूबाजूच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना परवडणाऱ्या, गुणवत्तापूर्ण आणि सहानुभूतीपूर्वक वैद्यकीय सेवा देण्यास कटिबद्ध आहे.
ध्येय
दर्जेदार, कार्यक्षम आणि रुग्णकेंद्रित काळजीद्वारे आपल्या प्रदेशातील आरोग्य सेवा संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणे.
दृष्टीकोन
रुग्ण, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्यासाठी आपल्या प्रदेशातील विश्वासार्ह आणि प्रथम पसंतीचे रुग्णालय बनणे.
उद्दिष्टे आणि कार्य
आरोग्यविषयक समस्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना, धोरणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणेबाबत समाजात जनजागृती वाढविणे.
जिल्ह्यातील सर्व जनतेस, विशेषतः वंचित आणि आरोग्य दृष्टया उपेक्षित समाजास, समान व सहज सुलभ आवश्यक त्या प्राथमिक व द्वितीय आरोग्य सेवा उपलब्ध करणे.
रोग प्रतिबंधक आजारांचे प्रमाण कमी करणेसाठी, लसीकरण, आजाराचे त्वरित निदान आणि आरोग्य तपासणी यासारख्या उपाययोजना केंद्रस्थानी ठेवणारे कार्यक्रम राबविणे.
तांत्रिक प्रगती, मानव संसाधन विकास व सातत्यापूर्ण आरोग्य कार्यक्रमांमध्ये सुधारणेव्दारे, प्राथमिक आणि द्वितीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे.
भविष्यातील आरोग्यविषक कल व समस्यांविषयी निर्णय क्षमता वाढविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण प्रणालीव्दारे सनियंत्रण करणे.
आरोग्य सेवा, यंत्रणा तसेच पायाभूत सेवासुविधा यांच्या बळकटीकरणासाठी सामाजिक भागधारक, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांचेसोबत शासकीय यंत्रणेच्या सहभागास प्रोत्साहन देणे.
रोगाचा प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आरोग्यविषयक आपदा यासारख्या आरोग्यविषयक आणीबाणी परिस्थितीवर मात करणेसाठी तयारी करणे आणि त्याविषयी प्रतिकार करणे.
सर्व स्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणे, आरोग्यविषयक निधीमध्ये वाढ व आरोग्य यंत्रणेमधील सुधारणा यामध्ये बदल घडवून आणणेकरिता सहकार्य करणे.
आरोग्यविषयक कार्यक्षम व प्रभावी सेवासुविधा मिळण्यासाठी भौतिक व तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याकरिता सहकार्य करणे.
आपल्या प्रदेशातील आरोग्य सेवा विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांचे तांत्रिक, व्यवस्थापकीय व नेतृत्व कौशल्ये व कार्यक्षमता वाढविणेकरिता प्रशिक्षण देणे.