Skip to main content
डॉ किरण कुऱ्हाडे
डॉ किरण कुऱ्हाडे
डॉ किरण कुऱ्हाडे

BLOOD CENTRE , INCHARGE

MD PATHOLOGY

रक्तपेढी विभाग

Blood Bank Department

-“शासकीय रक्तकेंद्र व रक्तघटक विलगीकरण केंद्र, जिल्हा रुग्णालय वाशीम” जिल्हा रुग्णालय, वाशिम येथील “शासकीय रक्तकेंद्र व रक्तघटक विलगीकरण केंद्र ” चे उदघाटन दिन -१७/०७/२०१० रोजी महिला व बालकल्याण मंत्री - मा.सुभाष झणक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तघटक केंद्राचे विलगीकरण उदघाटन वद-१७/०७/२०१३ रोजी मा.उपसचालक आरोग्य सेवा , अकोला मंडल अकोला मा. शशिकांत जाधव यांच्या हस्ते झाले. तसेच महाराष्ट्र शासन मार्फत चालू करण्यात आलली '' जीवन अमृत सेवा योजना दिनांक -०७/०१/२०१४ रोजी सुरू करण्यात आली होती.सदर योजना महाराष्ट्र शासनाने ३१ मार्च २०२२ रोजी शासनाच्या आदेशयानुसार बंद करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालय वाशिम रक्तकेंद्र व रक्तघटक विलंगीकरण केंद्र ,अंतर्गत वाशिम व जिल्ह्यामध्ये एक रक्त साठवनुक केंद्र कार्यरत आहे. १) कारंजा –सुरू आहे २ ) मंगरुळपिर , आणि रिसोड येथे रक्त साठववणूक केंद्र सुरू करण्यास कार्यवाही सुरू आहे.